आज्ञापत्र - पत्र ६१
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदिकरुन थोर लाकूड असावें लागतें. ते आपल्या राज्यांत अरण्य़ामध्यें सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे जें अनुकूल पडेल तें हुजूर लेहून परवानगीनें तोडून न्यावें. याविरहित जें लागेल तें परमुलकीहून खरेदी करुन आणवीत जावें. स्वराज्यांतील आंबे, फणस आदिकरुन हेहि लाकडे आरमाराचे प्रयोजनाचीं. परंतु, त्यास हात लाऊं न द्यावा. काय म्हणोन कीं, हीं झाडे वर्षा दो वर्षांनी होतात यैसे नाहीं. रयतेने ही झाडे लाउन लेकरांसारखी बहुत काळ जतन करुन वाढविली तीं झाडें तोडलियांवरी त्यांचे दु:खास पारावार काये ? येकास दु:ख देऊन जें कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारासहित स्वल्पकालेंच बुडोन नाहींसे होतें. किंबहुना धण्याचेच पदरीं प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानीहि होते. याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊन न द्यावी. कदाचित यखादें झाड जें बहुत जीर्ण होऊन कामांतून गेलें असेल, तरी त्याचे धण्यास राजी करुन त्याचे संतोषें तोडून न्यावें. बलात्कार सर्वथा न करावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP