आज्ञापत्र - पत्र २९
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
सरकारकुनात मुतालिक देणें तेहि सर्वोत्कर्षगुणसंपन्न, ज्या त्या मामलियाचा सांग निर्वाह करीत आणि आपले बोढीचे, यैसें पाहून द्यावें त्यांचे हातुन सरकारकुनीं त्यांसी वैषम्य न करितां मामला घेत जावा. सरकारकुनाचे निसबतीचे लोक आणि कार्यकर्ते मनुष्य असलिया धण्यांनी प्रत्यकवादें त्याचे स्वरुप योग्य मामले सांगोन सेवा घ्यावी. ज्याचे निसबतीचें जें मनुष्य त्यासी त्याचेच मामलियांत सर्वथैव न ठेवावें.
देशदुर्गांचे संरक्षण, नूतन देशसंपादन योद्धेलोकांविरहित होत नाहीं. तथापि, तो यखतियार केवळ त्याच लोकांचे हातीं दिधलियानें तो लोक युद्धाच्या प्रयोजनाचे. पुण्य-पापांचे भय धरुन, स्वामी-सेवक भावें वर्तोन इतरांस वर्तविणें, यथान्यायें मुलकाचा बंदोबस्त करणें, शास्त्रन्यायें अन्याय शोधून पारिपत्य करणें, ही कामे सरकारकुनाची आहेत. याकरिता संपूर्ण राज्यभर व देशदुर्गाचा यखतियार सरकारकुनाचे हाती द्यावा. सेनानायक त्या अधीन करावे. येणेंकडून समयी सरकारकुनापासोन अंतर पडिल्या शासनविषयीं संकटहि पडत नाही. किंबहुना सकळ कार्यभागांत येकास येक मुदई होऊन असतात. त्यामुळें आपण लाऊन दिल्ही मर्यादा येकाचें भयें येक सुरळित चालवितात.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP