आज्ञापत्र - पत्र १७
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
तसेंच संपादिले वैभवावरीं कृतकार्यता मानलियाने पुढें उद्योग राहतो. समयीं शत्रु जालियाने आहे राष्ट्र यावरीच संकट पडतें. यैसे होऊं न द्यावें. संपादिले पाठीसी घालीत नित्यनूतन संपादावें, उद्योग करावा. आयव्यव विचार पाहून जेणेंकडून दिवसेंदिवस राज्यात खजाना होय तें करावें. खजाना म्हणजे राज्याचें जीवन. पडले प्रसंगी खजाना आणून खजाना संग्रह करावयाची बरी नजर धरावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP