आज्ञापत्र - पत्र २०
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
यैसा जो जमाव ठेवावा त्यास रात्रंदिवस दरबाराच्या चौक्या पहारे नेमून देऊन त्याप्रमाणे त्यांची नित्य हजेरी पाहत जावी. येक वेळ हजीर न जाला तरी समजाऊन सांगावें. मागती अंतर पडलें तर दटाऊन सांगोन जागा करावा. इतक्यावरिहि मोइनेप्रमाणें चौकी-पहारा न राखेच तरी त्यास परिच्छिन्न दूर करावें. शासनयोग्य अन्याय केलिया तेच क्षणीं यथायोग्य शासन करावें; भीड धरु नये. मुळीं हुजरातींत मर्यादा न चाले तरी मग बाहेर काय चलो पाहाते ? दुसरियावर न टाकिता आपले मायेचे, इतर अर्जव न जाणेत यैसे सवनिसचे विद्यमानं आपण स्वतां करीत जावी. लोभ करुन रसिकतेनें मनुष्य आपले मायेंत बरे आणावें. सकळांपेक्षां हुजरांत बरी ताजी राखावी. आणखी कोण्ही फितावलियानी हा निर्वाह इतर स्थळीं होणार नाहीं. यैसे त्याचे प्रत्ययास कोण्हाचे फितवियांत न मिळेत यैसें करावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP