आज्ञापत्र - समाप्ति
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
याप्रमाणे हुजरात, गड-किले आदिकरुन परम सावधानतेने वर्तत मातुश्रीसाहेब यांचे सेवेसी कोण्हेहि अर्थे अ ६ तर न पडे, तुम्ही केले सेवेचा मजुरा होय आणि या दिग्मंडलामध्यें यशास तुम्ही पात्र होऊन स्वामींनी जो तुम्हांवरि यखतियार दिल्हा आहे आणि स्वामीचीं जी अनुपम दया तुम्हांवरी आहे ते दिनप्रतिदिनीं अभिवृद्धीस पावे ते गोष्टी करणें.
तो योजिला संपूर्ण उद्योग सिद्धीस पावऊन सत्वरींच स्वामींचें आगमन ते प्रांते होत आहे तदोत्तर तुमच्या विचारें आणखीहि कितेक नाजुक धंद्याचे नेम परंपरेने राज्याभिवृद्धिस उपयुक्त आणि येहलोक-परलोक-साधन ज्यांत संपूर्ण कीर्ति ते सर्वहि यथान्यायें करुन दिल्हे जातील.
जाणिजे, लेखनालंकार प्रतलेखन
(प्रतलेखन) शके १७२२ रौद्रनाम संवत्सरे, पौष वद्य चतुर्थी रविवारीं लेखन समाप्त ॥
भग्नकटिग्रीवं बखैर लिखितं मया
शुद्धो वापि अशुद्धो वा मम दोषो न विद्यते ॥१॥
तैलाद्रक्षेतज्जलाद्रक्षेत रक्षेत सिथिलबन्धनात
मूर्खहस्ते न दातव्यमेतदवदति पुस्तकम ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP