आज्ञापत्र - पत्र १४
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
सर्व शिल्पाचे हुनर अवश्यमेव अवगत करुन ठेवावे. परंतु, हे श्रमावह धंदे स्वांगे करीत जावें. काये म्हणोन कीं, या व्यसनीं गुंतलियाने राजकार्यास अंतर पदते. राजे लोकांस मुख्य साधनीय तो कारभार आहे. त्यात विक्षेप पडो न द्यावा. कलावंत, धाडी, गुनिजन, यांचे नृत्य-गायन महोत्सवाविरहित दरबारीं करुं नये. काये म्हणोन कीं, या प्रसंगी चित्त आसक्त जालें नाहीं तोच बरें. कांही येक आसक्ति जाहलियाने आवरीन म्हणतां आवरले जात नाहीं. तेंव्हा व्यसन प्राप्त होऊन राजकार्ये अंतरतात. किंबहुना, आणखीहि त्यामुळे दोष घडतात. याकरितां कोण्ही येक यैसें दुर्व्यसन याची संभूति होऊं देऊं नये.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP