आज्ञापत्र - पत्र २८
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
सरकारकुनी सांगितल्यानंतर क्षणांक्षणां त्याची अवगणना, अपमान सर्वथा न करावा. कदाचित समयाचे गुणें सरकारकुनापासोन यखादें जाणत नेणत अनुचित कर्म होत असिले तरी ते गोष्ट चित्तांतच ठेऊन त्याचा ऐष इतर लोकांत न बोलतां ते गोष्ट आपणांस कळली यैसेंहि त्यास अथवा वरकड सेवकांस कळो न देतां, युक्तीचे वाटेनें पर्यायेंकडून त्यापासून तो दोष सांडवावा. सरकारकुनादि सेवक येकायेकी त्यासारखे मिळणें कठीण. यास्तव या लोकांचे बहुमानाविषयीं बहुत सावध असावें. तरीच चित्तप्रशस्तेनें यथोचित राज्यभार चालवितात, उमेदवार होऊन जाले श्रम चित्तांत न आणितां अधिकोत्तर संपादितात.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP