आज्ञापत्र - पत्र ३७
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
वतनदारांचा परस्परें कलह होऊं न द्यावा. वतनदाराची खुशामत बरी करीत जावी. परंतु त्यास वर्तवावयाचा पाइंडा आहे, त्या चालीस तिळतुल्य जाजती होऊं न द्यावें. अंतर पडिल्या तात्काळ शासन करावें. वतनदार पाहून वर्षा दोवर्षा कांही समर्पक अंतर स्थापून अल्पस्वल्प द्रव्यादिग्रहणें हलकें करीतच असावें. ज्याजवळोन अंतर पडिलें नसेल तैसा वतनदार जवळ असतां इतर सेवकांजवळ हे वतनदार बहुभले, प्रामाणिक मायेचे, इत्यादि त्यास प्रोत्साहन होय, यैसीं वचनें बोलत जावीं.
वतनदारांमध्ये कार्यकर्ते आनि प्रामाणिक मनुष्य असल्या तैसे सेवक मिळणें परम कठीण. आधी वतनदार हा येक विश्वास, ततोपि प्रामाणिक, म्हणजे सोनें आणि सुगंध, याकरितां त्याचा अत्यादरें संग्रह करावा, मेहमानी करावी, बहुमान वाढवावा, हुजूर-सेवा सांगावी, किंबहुना जे नाजुक कार्य असेल तैसे कार्यावरीं ठेवावें.
वृत्ती आणि दान
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP