आज्ञापत्र - पत्र ११
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
वेशधारी , फकीर, जोगी, जंगमादि जे केवळ दांभिक, भुताटकी करुन फिरणार, त्यांचा विश्वास न धरितां, मोह न पावतां अल्प-स्वल्प भिक्षा घेऊन परभारें वाटेस लावावें. धर्मास विरुद्ध यैसी पाषांडी मतें राज्यांत सर्वथैव होऊ देऊ नये. कदाचित कोठेही उदभव जाला तरी त्याचा स्वतां परामर्ष करुन पुन्हां कोण्ही त्या दुष्ट मार्गाने प्रवर्तेत यैसी सिक्षा करुन तो मार्ग मोडून टाकावा. तपस्वी, शीघ्रकोपी यांचा सहवास न करितां दुरुनच त्यांचा परामर्ष करुन संतोषरुप राहत, आशीर्वाद देत तें करावें. अंध, पंगु, अतुर, अनाथ, अनुत्पन्न जे असतील त्यांचे ठाई भूतदया धरुन ते निवांत असिजे तों त्यांचा जीवनोपाय करुन देऊन चालवीत जावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP