आज्ञापत्र - पत्र ३१
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
त्यास संपूर्ण राज्यभार व देशोदेशींचे पारपत्य यकाचेंच स्वाधीन करणें परम अनुचित. प्रत्यक प्रत्यक सरकारकुन, प्रत्यक प्रत्यक सेनानायक यांसीं आटोपानुरुप प्रत्यक प्रत्यक कार्ये सांगावी. तितकियांचा स्वतां परामर्ष करावा. कार्यभागपरत्वें लागले उपसाहित्य तें आपण वरचेवरी अनुकूल करुन द्यावें. केले कार्यानुरुप त्याचा बहुमान करीत जावा, म्हणजे उमेद वाढून येकाचे ईष्येनें येक असाध्य कर्म तेहि साधितात. दिनप्रतिदिनीं प्रतिपच्चंद्रन्याय राज्याभिवृद्धि करितात. येकाचेंच हातें राज्यभार असलियावरी इतर तत्समान जे आहेत ते उदासीन होतात. किंबहुना जो पुढें होतो त्याचें व त्याणें केले कार्याचे अपकारास प्रवर्ततात. येणेंमुळें राज्यभार नाश होतो. याकरितां बुद्धिमंत नृपतीनें हे गोष्टी सहसा न करावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP