आज्ञापत्र - पत्र ३२
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकारांकरिता राज्य अवादान होतें. न मिळे ते वस्तुजात राज्य़ांत येते; राज्य श्रीमंत होतें. पडिलें संकटप्रसंगी पाहिजे तें कर्जवाम मिळतें. तेणेंकरुन आपलें संकतपरिहार होतें. साहुकाराचें संरक्षणमध्यें बहुत फायदा आहे. याकरितां साहुकारांचा बहुमान चालवावा. कोण्हेविशीं त्यावरीं जलल अथवा त्याचा अपमान होऊन न द्यावा. पेठापेठांत दुकानें-बखारा घालोन हत्ती, घोडे, नरमिना, जरबाब, पशमी आदिकरुन वस्तजात व रत्नें व शस्त्रे आदिकरुन अशेष वस्तुजात यांचा उदीम चालवावा. हुजूरबाजारमध्येंहि थोर थोर सावकार आणून ठेवावे. वर्षसंबंधे तसेंच लग्नादि महोत्सवी त्यांचे योग्यतेनुरुप प्रतिष्ठेने बोलाऊन आणून वस्तपात देऊन समाधान करीत जावें. परमुलखीं जे जे सावकार असतील त्या ६ ची समाधानें करून ते आणावे. त्यांसी अनुकूल न पडे तरी असतील तेथे ६ च त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यांस लाऊन त्यांए मुतालिक आणून, त्यांस अनुकूल ते जागा, दुकानें देऊन ठेवावें. तैसेच दर्यावर्दी सावकार यांसहि बंदरोबंदरी कौल पाठऊन आमदरफ्ती करवावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP