आज्ञापत्र - पत्र ३९
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
जरी रयतेवरीं हक करुन दिल्हा तरी नूतन कानूमुळें रयतेवरी जलाल होऊन रयत पीडा पावते, श्रमी होते. येकाचे सुखानिमित्त बहुतांस श्रम करावे, या कर्मामध्ये दुसरा शाप द्यावाच न लगे. बहुतांचा शाप यहलोकीं परलोकीं बाधक. तैसेंच ज्याची वृत्ति द्यावी त्याचसारिखें त्याचे वंशज होतील यैसे नाहीं. कदाचित ताचे वंशजांनी त्यांचे मागे हरामखोरीची नजर धरिली तर त्यास ताच वृत्तींचे बळ होणार. तेव्हां विशेष अमर्याद होतोत. मग आपण होऊन राज्याचें शाश्वत अकार्य करून ठेविलें यैसे होतें. अथवा केल्या अन्यायास्तव आपले वंशजांनीं ते वृत्ती दूर केली तरी स्वदत्तापहार दोष आपले वंशजावरीं येतो. तैसेंच या कलियुगी दिवसेंदिवस पाप अधिकच होणार, प्रस्तुत होत चाललेंच आहे; ततोपि वृत्तिवंतास तो पापाचें भयच नाहीं. कदाचित याच वृत्तीवर होत होत, ज्यासी वृत्ति द्यावी त्यांणें अथवा त्याचे वंशजांनीं दस्युभाव धरुन देशांत पीडा करु लागले, तरी तो दोष वृत्ति देणारावरीं येतो. इत्यादि दोष बरे चित्तांत आणून नूतन वृत्ति कोण्हास करुन न द्यावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP