आज्ञापत्र - पत्र ४८
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
स्थळास गनिमाचा वेढा आला तरी सामान व उपराळा आहे तो गडवईतून रोज जुंझोन स्थळ जतन करावें. सामान सरलें, उपराळा राहिला, निदान येऊन पडिले, तरी धण्यांनी हर उपायें मामलेदारादि लोक काढून आणुन वाचवावें. धण्याचा हात पावेना यैसें जालें तरी परिच्छिन्न मामलेदारादि लोकीं यका करुन मरावें. त्याचे मुलांलेकरांचे धण्यांनीं सर्व प्रकारे चालवावें. परंतु, लिहिलेप्रमाणे निदान येऊन पडिलें तरी सला करून, स्थळ देऊन आपला जीव वाचवावा यैसें सर्वथा न करावें. जो मामलेदार यैसे करुन तोंड घेऊन येईल त्याचे मुखावलोकन न करितां, फिरोन सेवा न सांगता त्यास घरीचे बसवावे. फिरोन त्याचेविसीं कोण्ही अर्ज करीत तरी त्यास अर्ज करुं न देतां लिहिलेप्रामाणे त्यास ठेऊन, स्थळाचा तगादा लाऊन विलाज करवावा. तो श्रम करीत असतां स्थळाचा उपाय न होय, तेणेंमुळे शरमिंदा होतो, भय वागवितो, यैसे प्रत्ययास आलें तरी मग कोण्हीही सरकारकून अर्ज करितील त्यांचे भिडेनें अर्ज कबूल केला यैसें करुन त्यास दर्शन देऊन हुजूरचा मामला सांगावा. मग वाढवीत वाढवावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP