आज्ञापत्र - पत्र ५२
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचे घर बांधो नये. राजमंदिरास चुना दाट गच्च द्यावा. घरांत कोठे उंदीर, विंचू, किडा, मुंगी राहे यैसी दरज न ठेवावी. घरास कुसूं पाहिजे ते निर्गुडी आद्किकरुन झाडाचे पातळ घालावें. गडकरी यांणी राजमंदिर म्हणोन खाली न ठेवावें. सर्वकाळ वस्ती करुन धूम्रें करुन घर साबूत राहें, जीवजंतू राह न पावें तें करावें. धणीं गडावरी येतात यैसें कळतांच अगोधर दोन-च्यार दिवस मामलेदारानें येऊन, खासा उभा राहून संपूर्ण घर सारऊन रांगोळी आदिकरुन घालऊन, धणीं गडावरी येईत त्याच जागां सदर करुन बसत जावेम. गडावरी व मार्गामार्गावरी व बाजारांत, तटोतट केरकस्पट किमपि पडो न द्यावें. ताकीद करुन केर गडाखालें न टाकितां जागां जागां जाळोन ते राखहि परसापरसांत टाकऊन घरोघर होतील भाजीपाले ते करवावे.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP