आज्ञापत्र - पत्र २१
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
तखारा, कटारा, तीर-कमाना, बंदुखादि हत्यारें, बख्तरें,घग्या, टोप, चिलखत, पाखरा, ताज, हुके, दारुगोळे,बाणादि सामान बरें संपादून मजबूत असावें. लिहिलेप्रमाणे जमाव व सामान हमेशा जवळ व स्वतां उद्योगसील यैसे असलियाने मग काय न्य़ून पडोन पाहतें ? बाहेरील फौज व सरदार हुकूम मानितात, आपणांस हरयेक कार्याची हिंमत असते. पराधीनता न घडतां शासन अब्याहत चालते. आपले शूरत्वाचा आस्कारा वाढतो. शत्रु आदिकरुन सकळहि वचक मानीत हलखुद असतात. याकरितां हुजरातीची उपेक्षा न करिता सकळ राजकार्यात हे अग्रेसर कार्य आणून हुजरातींत सिलेदार येकंदर न ठेवितां लिहिलेप्रमाणें हुजरात सजावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP