आज्ञापत्र - पत्र १३
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
भोजन, उदक-पान यांचा समय नेमून त्यांस अन्यथा होऊं न द्यावे. उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षूं नये; जवळील सेवकांस भक्षू देऊं नये. सर्वकाळ हत्याराव्यतिरिक्त खाली हात राहू नये. हत्यारमात्राची भेजणूक-विद्या संपादून बाण भरणें, भांडी वोतविणे, सुरंग लावून मोर्चे चालविणें व जीन, खोगीर, बख्तरादि मुस्तैद करावयाचे संपूर्ण हुनर अवगत करुन ठेवावें. येणेकडून ज्याणें जो श्रम केला त्याचा गुण कळोन तदनुरुप त्याचे श्रमाचे सार्थक करिजेते. अन्यथा न्यून जालियानें कृतघ्नता येते. विशेष दिधलियानें गाफिली दिसते. याकरिता हें लिहिलें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP