आज्ञापत्र - पत्र ५९
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
दर्यात कोण्ही सावकारांचे वाटे जाऊं नये. त्यांस कोण्हाचा उपद्रव लागत असेल तर तो परिहार करावा. गनिमाचे मुलकाची विदेशींची व गैरकौली यैसे सावकारा ६ ची तरांडी येतां - जातां आली तरी तीं परभारें जाऊं न द्यावीं. अभय देऊन, दिलासा, करुन, त्यांचे दसोडीस हात न लावितां बंदराबंदरास घेऊन द्यावे. मुलुकगिरीचे कारभारी यांणी जाऊन त्यांचे समाधान करावें. लाकडें-पाणी घेतील तें घेऊं द्यावें. बहुताप्रकारें नारळाचे शाहाळे आदिकरुन जें त्यास पाहिजे तो जिन्नस असेल तो विकत अनुकूल करुन द्यावा. कोण्हें येक प्रकारें त्या त्या परकी सावकारास सौख्य दिसे, माया लागे, राज्यांत आमदरफ्ती करीत यैसें करावें.
गनिमाचे मुलकांतील तरांडी दर्यात असल्यास कस्त करुन घ्यावी. धरुन बंदरांत आणावीं. मालांत काडीइतकी तसनस न करिता तमाम माल जप्त करुन महालांचे कारकुनांनी व आरमारकरी यांणी हुजूर लेहुन पाठवावे. आज्ञा होईल तैसी वर्तणूक करावी. आरमारास व गनीमांस गाठ पडोन जूझ मांडले तरी सर्वांनी कस्त करुन येक जमावें. गनीम दमानी घालून जुझावें. वारियाचे बळें गनीम दमानी न येतां आपण पडलों, आपलें गलबत वार्यावरि न चलें यैसे जाहलें, तरी कैसेंहि आपलें बळ असो तर्ही गनिमासी गांठ न घालितां गाठ तोडीत आपले जंजिर्याचे आश्रयास यावें. तरांडियास व लोकांस सर्वथा दगा होऊं देऊं नये. आपणांस राखून गनीम घ्यावा. गनीम दमानें पडोन हारीस आला, जेर आला, तर्ही येकायेकी उडी घालो नये. दुरुन चौगीर्द घेऊन भांडियाचा मार देत असावें. दगेखोर गनीम आपण जेर जालों यैसे जाणून दगाबाजीने घेतो, म्हणोन जवळ बोलाऊं नये. आपल्याजवळ बोलाविल्याने पायाला आगी टाकून तरांडे जाया करितो. याकरितां त्याचा विश्वास न मानितां, कैलास आला तरी दुरुनच कौल देऊन त्याचेच बतेल्यावरुन, सरदारदेखील लोक आपणांजवळ आणावें. मग, त्याचे तरांडियावरी आपले लोक चढवावे. नाहीतरी मालशांतीची तमा न धरितां भांडियाचेच माराखाले तरांडे फोडून टाकून सलाबत पाडावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP