आज्ञापत्र - पत्र ४४
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
गडकोट संरक्षणाचें कार्य परम नाजुक आहे. स्थळास मामलेदारादि जे लोक ठेवावे त्यांणी यखादा भेद केलियामुळें, अथवा शत्रु चालोन आला असतां नामर्दी केल्यामुळें, अथवा त्यांचे गाफिलीमुळें स्थळास दगा जाला तरी स्थळरहित तितके राष्ट्र हातींचे गेले; उरल्या स्थळांस व राज्यास उपसर्ग लागला. शत्रु प्रबळ होऊन पावला असतां जो गेला लेल्ला त्य किल्लेकराची सर्वे इतर राहिले किल्लेकरांस लागोन तेहि स्थळास अपाय योजतात. म्हणजे येकेक राज्यासच धक्का बसतो. याकारणें किल्लेकोट जतन करणें हे गोष्ट सामान्य आहे यैसें न समजतां तेथील उस्तवारी व शासन यांस तिळतुल्य अंतर पडो न द्यावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP