आज्ञापत्र - पत्र ३८
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
लहान अथवा थोर परंतु प्राचीन परंपरागत वृत्ति चालत आल्या असतील तो वृत्तिलोप केलियानें परम पातक आहे. येकाची वृत्ती येकास सर्वथैव न द्यावी, स्वतां अपहार न करावा. कदाचित वृत्तिवंताने अपराध केला तथापि, त्यास यथाशास्त्र शासन करावें. परंतु, वृत्यपहार करावा हें विहित नव्हे. वृत्तपहार करावा यैसा महपराधहि केला असिला तरी, शास्त्र काढून सास्त्रावरीं भार देऊन शास्त्रीं सांगितले असेल तैसें करावे. मुख्यार्थ हाच कीं, न्याय न पाहतां अन्यायें दुसरियाचा वृत्यपहार करावा हे क्षुद्रबुद्धि सहसा करू नये.
तैसेच सेवकलोकी अथवा वृत्तिवंतांनी सेवा उदंड केली तरी त्यांसी द्रव्य, अश्व, गज, वस्त्र, भूषणादि द्यावीं, योग्य पाहून थोर सेवा सांगावी. परंतु, नूतन वृत्ति करुन देऊं नये. किनिमित्त कीं, जरी दिवाण महसुलांत वृत्ति करुन दिधली तरी तितका महसूल वृत्तिवंशपरंपरेने न्यून होतो. महसूल न्य़ून होणे हे राज्याची शीर्णता. राज्याची शीर्णता तोच राज्यलक्ष्मीचा पराभव. याकरितां राज्यकुळी निर्माण जालियानें कोण्हाचे खुशामतीवर न जातां, मोह न पावतां, महसूल न्यून पडो न द्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP