आज्ञापत्र - पत्र ४७
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
किल्याचे मामले करीत असतां चोरीमारी, कचकलागत, सुस्ती नाकाबिली, इत्यादी अन्यय असलिया, सिरिरस्त्याप्रमाणे मुदतीचा मार्ग न पाहतां त्यास काढुन आणावें. अन्याय पाहून शासन करावें. त्या मामल्यावरी त्यामामल्यायोग्य दुसरे मनुष्य मर्दाने पाहून पाठवावें. गडकोट मामलेदाराने अथवा हरयेकानें स्थळास दगा होये यैसी दुर्बुद्धि धरिली आहे यैसे वर्तमान आले तरी आधीं प्रमाणाप्रमाण न पाहतां, प्रलापावरी न घालितां, त्यांस सावध होऊ न देतां, ततछणी काम हातीचे न जाय यैसा उपाय योजोन, कोण्हास कळो न देतां त्यास काढून आपणांजवळ आणावें. हुजूर आल्यावर रास्ती न्याय करुन, अन्याय खरा जाला तरी तात्काळ बेमुलाहिजा त्याचा शिरच्छेद करावा, आणि तें शिर गडोगडीं फिरवावें. यैसे जो करील त्यास हा नतीजा म्हणोन धांदोरा पिटवावा. वाजवी न्याय करितां निरपराध जाला तरी त्यांचे आपणांस काढून आणिलें हा डाग चित्तांतून जाय यैसें बहुता रीतीनें समाधान करावें. परंतु, फिरोन त्याचे मामलेयावरी त्यास न पाठवावे. रोजमरा चालऊन सहा - चार हुजूर ठेऊन मग त्यायोग्य मामला असेल त्यावरीं पाठवावें. तैसेच आणखी खरी अथवा लटकी बदलामीमुळें ज्या स्थळींहून मनुष्य आणावें, रोहपोहमुळे दुरापराध जाला तरी फिरोन त्याचे मामलेयावरीं त्यास न पाठवावें. अन्याय खरा जाल्यावरी परिच्छिन्न त्या त्या अन्यायारुप शासन करावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP