आज्ञापत्र - पत्र ५८
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
आरमारास तनखा मुलकांत नेमून द्यावा. पैदास्तीवरी नेमणूक सहसा न करावी. पैदास्तीचे नेमणुकेमुळे उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंदरे राहिलीं पाहिजेत प्रायोजनिक वस्त ते परस्थळीहून आणावी तेव्हां येते. यैसे जाल्यामध्यें राज्याचा भ्रम काय उरला ? तैसेच जकाती आदिकरुन हासीलहि बुडाला. लुटीमध्ये गोरगरिबांचा सत्यानास होऊन अपरिमित पापहि वाढलें, आरमारकरिहि बेलगाम होऊन मन:पूत वर्तो लागले, तरी नेहमी तनखा मुलकांतून देणें घडते, तरी इतका अनर्गल प्रसंग न होता. कदाचित आरमारास सारा नेहमीं तनखा कैसा अनुकूल पडतो म्हणावें तरी जितका अनुकूल पडेल तितकेंच आरमार करता येईल. या रीतीनें आरमार सजीत सजीत सजावें.
आरमारकरी यांणी हमेशा दर्यात फिरुन गनीम राखावा. जंजिर्याचे सामान व दारु वरचेवरी पाववीत जावी. येविसीं जंजिरेकरी यांचा बोभाट हुजूर येऊ न द्यावा. सर्वकाळ दर्यावर्दी गनीमाचे खबरीत राहून गनिमाचा मुलूख मारावा. हवी पालती घालोन गनिमाचे स्थळांचे लाग करावे.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP