आज्ञापत्र - पत्र १५
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
कवीश्वरांमुळे कीर्ति प्रसरते. त्यांणी केले श्लोक, सुभाषित, कवित्वें यांमुळे शांति राहते. याकरिता, कवीश्वर, गुणी, शास्त्रज्ञ, प्रामाणिक, निर्व्यसनी यैसे पाहून त्यांचा आपल्या सामर्थ्यानुरुप संग्रह करु त्यांचे यथायोग्य बहुमान पुर:सर चालऊन ते संतोषरुप राहून स्वउद्योगी तत्पर रहात तें करावें. परंतु, केवळ स्वस्तुति प्रिय होणें हाहि दोषच आहे. याकरितां कारभार अंतरुन त्याचे भरीं मरूं नयें. तैसेच भाटहि मजलसींत, स्वारीमध्ये पूर्वील जाले राजे याणी संरक्षिले आहेत. याकरितां थोडे बहुत गुणी पाहून त्यांचाहि संग्रह करावा. परंतु, हे लोक कारभाराचे समयीं आणू नयेत. काये म्हणोनि कीं, कारभारविरहित रिकामे लोक कारभारांत आलिया कितेक कार्ये प्रगट बोलावयाची, कितेक गौप्य करावयाचीं आहेत. त्यास कारभारी लोकांस इतर लोकांचा संकोच प्राप्त होऊन अंतर पडतें. याजकरितां कारभारांत इतर लोकांचा प्रवेश होऊं न द्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP