आज्ञापत्र - पत्र ४२
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
दुर्ग आणि त्यांची व्यवस्था
संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजा होऊन देश उद्ध्वस होतो. देश उद्ध्वस जाल्यावरी राज्य यैसें कोण्हास म्हणावें ? याकरितां पूर्वी जे जे राजे जाले त्यांणी आधीं देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करुन घेतला, आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तीर्थरुप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्मान लेलें. जो जो देश स्वशासनवश्य न होय त्या त्या देशीं स्थळविशेष पाहून गड बांधिलें, तैसीच जलदुर्गे बांधिली. त्यावरून आक्रम करीत करीत साल्हेरी-अहिवंतापासोन कावेरीपर्यंत निष्कंटक राज्य संपादिलें. अवरंगजेबासारिखा महान शत्रु चालोन येऊन विजापूर-भागानगरसारखी महासंस्थाने आक्रमिलीं. संपूर्ण तीस - बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यासी अतिशय केला, त्याचे यत्नास असाध्य काये होतें ? परंतु राज्यांस किल्ली होते म्हणोन अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढें पूर्ववत करावयास अवकाश जाहला.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP