आज्ञापत्र - पत्र ५
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
त्यास आधीं राज्याचा बंदोबस्त केलिया अनायसें इतर प्रयोजने सिद्धीस जातात या विचारें राज्यातील सरकारकडून व सरदार आदिकरुन लहान-थोर सेवक यांचे यथोचित बहुमान करुन समाधानें केली. कितेक नूतनच सेवक कार्यकर्ते नवाजिले. सकलांचि चित्तें हातीं घेऊन येकाचा द्वेष करूं न देतां यथायोग्य, यथानुक्रमें राजकार्यास प्रवर्तविले. जे अमर्याद प्रतिकूल होते त्यांस यथोचित शासनें अनुकूल करुन मर्यादेनें ठेविलें. जे केवळ अनर्गल, उत्पाती, उपेक्षा केलियानें अन्यायाची वृद्धी होणार यैसे जे होते त्यांस मारून गर्देस मेळविलें. संपूर्ण प्रजा अभये निरुपद्रव केली. देश स्वस्थ केला.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP