आज्ञापत्र - पत्र ५३
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
गडावरी धान्यगृहें आहेत त्याम्स अग्नि, उंदिर, किडा-मुंगी, वाळवी यांचा उपद्रव न बाधी यैसे भूमीस दगडांची छावणी करुन गच्च बांधावी. ज्या किल्यास काळा खडक दरजेविरहित असेल तैसे ठाई तेलातुपास टाकी करावीं. स्वल्पमात्र दरज असेल तरी चुना कमावलेला लाऊन पाझर न फुटे यैसें करावें. गच्चीस धर चांगला यैसी भोई असेल तेथें गच्चीघर करुन थोर थोर काचेचे मर्तबान, झोलमाठ-मडकीं आणोन त्यास मजबूत बसका करुन त्यांत तेल-तूप सांठवावें.
दारुखाना घराजवळ, घराचे वारियाखालें नसावा. सदरेपासून सुमारांत जागा पाहोन भोवतें निर्गुडी आदिकरुन झाडाचें दाट कुसूं घालून बांधावा. त्यांत तळघर करावें. तळघरात गच्च करावा. त्यांत माच घालून त्या घरी दारुचे बस्तेमडकी ठेवावी. बाण-होके आदिकरुन मध्यघरात थेवावे. सरदी पावो न द्यावी. आठ-पंधरा दिवसांनी हवालदारांनी येऊन दारु, बान, होके आदिकरुन बाहेर काढून उष्ण देऊन मागतीं मुद्रा करुन ठेवीत जावें. दारुखान्यास नेहमीं राखण्यास लोक ठेवावे. त्यांणी रात्रंदिवस पाहरियाप्रमाणें जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्य यिऊं न द्यावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP