मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
श्रीमुखाची शोभा कस्तुरी...

संत चोखामेळा - श्रीमुखाची शोभा कस्तुरी...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवर ॥१॥

कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फाकती दशदिशां ॥२॥

वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥

चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP