मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
उतरलें सुख चंद्रभागेतटी...

संत चोखामेळा - उतरलें सुख चंद्रभागेतटी...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


उतरलें सुख चंद्रभागेतटीं । पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥

बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥

जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥

चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्‍त्रां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP