मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
श्रीमुख चांगलें कांसे पीत...

संत चोखामेळा - श्रीमुख चांगलें कांसे पीत...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


श्रीमुख चांगलें कांसे पीतांबर । वैजयंती हार रुळे कंठीं ॥१॥

तो माझ्या जीवींचा जिवलग सांवळा । भेटावा हो डोळां संतजन ॥२॥

बहुतांचें धांवणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥

चोखा म्हणे वेदशास्‍त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हां रक्षी नानापरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP