मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
माझा शिण भाग अवघा हरपला ।...

संत चोखामेळा - माझा शिण भाग अवघा हरपला ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥

अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥

चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्‌ठलनामगजरीं आनंदानें ॥३॥

दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥

तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP