मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
वैकुंठ पंढरी भिंवरेचे ...

संत चोखामेळा - वैकुंठ पंढरी भिंवरेचे ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


वैकुंठ पंढरी भिंवरेचे तिरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥

रुप हें सांवळें गोड तें गोजिरें । धणि न पुरे पाहतां जया ॥२॥

कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥

चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP