मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
अवघा आनंदा राम परमानंद । ...

संत चोखामेळा - अवघा आनंदा राम परमानंद । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


अवघा आनंदा राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥

हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणीक साचार दुजें नाहीं ॥२॥

काम क्रोधांचें न पडती आघात । वाचे गातां गीत रामनाम ॥३॥

चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP