मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आम्हां अधिकार उच्छिष्‍ट स...

संत चोखामेळा - आम्हां अधिकार उच्छिष्‍ट स...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आम्हां अधिकार उच्छिष्‍ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥

सुलभ सोपेरें विठोबाचे नाम । आणिक नाही वर्म दुजें काही ॥२॥

आवडीनें नाम गाईन उल्हासें । संताच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥

चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP