मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
देहीं देखिली पंढरी । आत्म...

संत चोखामेळा - देहीं देखिली पंढरी । आत्म...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


देहीं देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥

तोहा पांडुरंग जाणा । शांति रुक्मिणि निजांगना ॥२॥

आकारलें तितुकें नासे । आत्मा अविनाश विठ्‌ठल दिसे ॥३॥

ऐसा विठ्‌ठल ह्रुदयीं ध्यायीं । चोखामेळा जडला पायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP