मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आमुचा आम्हीं केला भावबळी ...

संत चोखामेळा - आमुचा आम्हीं केला भावबळी ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आमुचा आम्हीं केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥

भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥

निज भावबळें घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥

चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्ताचा अंकित म्हणूनी झाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP