मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
सर्वही सुखाचें ओतिलें ...

संत चोखामेळा - सर्वही सुखाचें ओतिलें ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


सर्वही सुखाचें ओतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥

कर दोन्ही कटीं सम पाय विटे । शोभले गोमटें बाळरुप ॥२॥

जीवाचें जीवन योगियांचें धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP