मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
कोणें देखियेलें जग । पांड...

संत चोखामेळा - कोणें देखियेलें जग । पांड...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


कोणें देखियेलें जग । पांडुरंग मी नेणें ॥१॥

मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥

एका आधीं कैर्चे दोन । मजपासुन मी नेणें ॥३॥

चोखामेळा म्हणती संत । हेही मात उपाधी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP