मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आणिक दैवतें काय बापुडीं ।...

संत चोखामेळा - आणिक दैवतें काय बापुडीं ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आणिक दैवतें काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥

तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगतां सहजा इच्छा पुरे ॥२॥

न लगे आटणी तपाची दाटनी । न लगे तीर्थाटणीं काया क्लेश ॥३॥

चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP