मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
अंगिकार करी तयाचा विसर । ...

संत चोखामेळा - अंगिकार करी तयाचा विसर । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥

तो हा महाराज चंद्रभागे तटीं । उभा वाळुवंटीं भक्तकाजा ॥२॥

अनाथा कैवारी दीना लोभापर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥

चोखा म्हणे माझी दयाळु माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP