मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
भक्तांचियां लोभा वैकुठं स...

संत चोखामेळा - भक्तांचियां लोभा वैकुठं स...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


भक्तांचियां लोभा वैकुठं सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥

कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जड जीवा उद्धरी नामें एका ॥२॥

बांधियलें ब्रीद तोडर चरणीं । त्रैलोक्याचा धणी पंढरीये ॥३॥

चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्‌ठल । नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP