मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आपुलिया सुखा आपणचि आला...

संत चोखामेळा - आपुलिया सुखा आपणचि आला...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥

तें हें सगुण रुप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पहा ॥२॥

किरीट कुंडलें वैजयंती माळा । कासे सोनसळा तेज फांके ॥३॥

चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रुप मनोहर गोजिरें तें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP