मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
भवाचें भय न धरा मानसीं । ...

संत चोखामेळा - भवाचें भय न धरा मानसीं । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशीं रामनाम ॥१॥

मंत्र हा सोपा नलगे सायास । जया रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥

दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥

आदिनाथ कंठीं जप हा सर्वदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥

चोखा म्हणे येथें सर्वां अधिकर । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP