मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
त्रैलोक्यवैभव ओंवाळोनि सा...

संत चोखामेळा - त्रैलोक्यवैभव ओंवाळोनि सा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


त्रैलोक्यवैभव ओंवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥

आणिक साधनें आहेत बहुता परी । नामाची ती सरी न पवती ॥२॥

म्हणोनि सुलभ विठ्‌ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥

चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP