मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
सुखा कारणें करी तळमळ । जप...

संत चोखामेळा - सुखा कारणें करी तळमळ । जप...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


सुखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्‌ठल वाचे ॥१॥

तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥

नलगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोबाचें ॥३॥

बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥

चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP