मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
मुळींचा संचला आला गेला कु...

संत चोखामेळा - मुळींचा संचला आला गेला कु...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


मुळींचा संचला आला गेला कुठें । पुंडलिक पेठे विटेवरी ॥१॥

विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरीये ॥२॥

भाविका कारणें उभारोनि हात । वाट जो पहात अनुदिनीं ॥३॥

चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP