मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
नामाचें सामर्थ्य विष तें ...

संत चोखामेळा - नामाचें सामर्थ्य विष तें ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥

तें नाम सोपें विठ्‌ठल विठ्‌ठल । नको काळ वेळ जपे आधीं ॥२॥

नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥

चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP