मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
करीं सूत्र शोभे कटावरी । ...

संत चोखामेळा - करीं सूत्र शोभे कटावरी । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


करीं सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥

बरवे दिसती जानू । तेथें मिरवे पात्रा कान्हो ॥२॥

पायीं वाजती रुणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥३॥

वाम चरणींचा तोडरु । परिसा उठतसे डोंगरु ॥४॥

दक्षिण चरणींचा तोडरु । जयदेव पदाचा तरु ॥५॥

विटेवरी चरण कमळा । तो हा जाणा चोखा मेळा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP