मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
कोणी पंढरीसी जाती वारकरी ...

संत चोखामेळा - कोणी पंढरीसी जाती वारकरी ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥

आनंदें तयांसी भेटेन आवडीं । अंतरींची गोडी घेईन सुख ॥२॥

ते माझे मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥

चोखा म्हणे तें माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP