मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
अवघ्या साधनांचें सार । रा...

संत चोखामेळा - अवघ्या साधनांचें सार । रा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


अवघ्या साधनांचें सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥

येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥

भाग्यें होय संत भेटी । सांगूं गोष्‍टी सुखाच्या ॥३॥

चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP