मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
योग याग तप व्रत आणि दान ।...

संत चोखामेळा - योग याग तप व्रत आणि दान ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


योग याग तप व्रत आणि दान । करितां साधन नाना कष्‍ट ॥१॥

सुलभ सोपेरें नाम विठोबाचें । सकळ साधनांचें मूळ बीज ॥२॥

येणें भवव्यथा तुटेल जीवाची । प्रतिज्ञा संतांची हीच असे ॥३॥

म्हणोनि नामाचा करा गदारोळा । म्हणे चोखामेळा विठ्‌ठल वाचे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP