मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
सप्रेमे निवृत्ति आणि ज्ञा...

संत चोखामेळा - सप्रेमे निवृत्ति आणि ज्ञा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


सप्रेमे निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्‍ताईचा भाव विठ्‌ठलचरणीं ॥१॥

सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥

कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णवजन ॥३॥

चोखा तयां पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP